जगाची श्रीमंती अफाट वेगाने वाढू लागली आहे. पण ती दिवसेंदिवस चिमूटभर अतिश्रीमंतांच्या हातात एकवटू लागली आहे. वाढणारी आर्थिक विषमता सामाजिक विषमताही वाढवत असते

‘ऑक्सफॅम’च्या जानेवारी २०२३मध्ये प्रसिद्ध झालेल्या अहवालाचे उपहासात्मक शीर्षक आहे- ‘सर्व्हाव्हल ऑफ दी रीचेस्ट’ (‘श्रीमंतांनी धरलेली तग’). म्हणजे जगातील श्रीमंत महासाधीत कसे तग धरून राहिले. या शीर्षकाच्या खाली ऑक्सफॅमने उपशीर्षकाच्या रूपाने उपायही सांगितला आहे- ‘हाऊ वी मस्ट टॅक्स दी सुपर रीच नाऊ टू फाईट इनइक्वॅलिटी’ (‘विषमतेविरुद्ध लढण्यासाठी आता आपण अतिश्रीमंतांवर कसे कर लावले पाहिजेत.’).......